सोनई येथील हॉटेल चालकावर कत्तीने वार करणाऱ्या टोळीचा मोरक्याला जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सौरभ उर्फ शेग्या अशोक गजभिव (रा. राजवाडा सोनई ता. नेवसा) असे आरोपीचे नाव आहे. दहशत करणाऱ्या गुन्हेगाराच्या टोळीने तु आमच्या समाजाच्या विरोधात भाषणे करतो. तुझा गेम करतो अशी धमकी देत हॉटेल चालकावर कत्तीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात लक्ष्मण गंगाधर जगधळे (वय 38, रा. दत्तनगर, सोनई ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तपासादरम्यान, पथकाल सदर गुन्ह्यातील टोळीचा मोरक्या सौरभ उर्फ शेग्या अशोक गजभिव चांदा रोडने घोडेगाव शिवारात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा लावुन त्याला शिताफिने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने आकाश मोहन काकडे, सचिन मोहन काकडे, जेकब अँन्थनी साळवे, सनि किसन शिंदे, दादासाहेब वैरागर सर्व (रा. सोनई ता.नेवसा ) यांच्यासमवेत केल्याची कबुली दिली. याप्रकरणी सोनई पोलिसांनी वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील
सपोनि/ हरिष भोये व पोलीस अंमलदार सुरेश माळी, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर,चालक चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे.


