लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या तरुणाने तरुणीचा मानसिक छळ करत तिला आणि कुटुंबीयांना पिस्तुलाचा फोटो दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित २७ वर्षीय तरुणी ही वाणी नगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. २०१७ साली ओमकार ज्ञानेश्वर सुपेकर याच्याशी तिची ओळख झाली होती. काही काळ मैत्रीचे नाते असले तरी २०२० पासून ओमकारने तिला जबरदस्तीने लग्नासाठी त्रास देणे सुरू केले. तरुणीने प्रस्ताव नाकारताच आरोपीने तिला शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतर तो विविध नंबरवरून कॉल करत त्रास देत असे. त्याने पिस्तुल हातात घेतलेल्या फोटोंद्वारे लग्न कर, नाहीतर परिणाम वाईट होतील असे मेसेजही बीहिणीच्या मोबाईलवर पाठवले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
नगर शहरात सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या तरुणाचा धक्कादायक प्रकार…
- Advertisement -


