Friday, February 20, 2026

Ahilyanagar Crime News :आई-वडिलांना मारहाण करून अल्पवयीन मुलीसोबत केले लग्न

अहिल्यानगर -अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना मारहाण करून तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न केले आणि अत्याचार करून गर्भपात करण्यासाठी मारहाण केल्याची धक्कादायक घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडित 17 वर्षीय मुलीने शनिवारी (20 डिसेंबर) रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या चौघांमध्ये पती, सासू-सासरे व अन्य दोघांचा समावेश आहे. पती, सासू-सासरे हे नागरदेवळे (ता. अहिल्यानगर) येथील रहिवासी आहेत. तर एक जण नालेगाव (अहिल्यानगर) येथील रहिवासी आहे. सदरची घटना 4 फेब्रुवारी 2025 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान घडली आहे. संशयित आरोपींनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना मारहाण केली आणि तिला लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर पतीने पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, ज्यातून ती गर्भवती राहिली.

पीडितेने गर्भधारणेची माहिती दिल्यानंतर, संशयित आरोपीने हे मूल नको असल्याचे सांगून तिला मारहाण केली. तसेच तिला गर्भपात करण्यासाठी धमकावून शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles