कर्जतालुक्यातील राशीन येथे पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एकाचा खून करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.30) जेरबंद केले.दि. 28 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास कोर्टी व राशीन शिवारात ही घटना घडली. आरोपी तेजस संजय काळे (वय 19, रा. कानगुडेवाडी, ता. कर्जत) आणि मयत चंद्रशेखर रामदास जाधव यांच्यामध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद होता. जाधव हे त्यांचा मित्र पृथ्वीराज साळुंके यांच्यासह त्यांच्या कारने करमाळा रोडने जात असताना, आरोपी काळे याने त्याच्या कारने त्यांचा पाठलाग केला.आरोपीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मयताच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चंद्रशेखर जाधव यांचा मृत्यू झाला, तर साळुंके जखमी झाले. याप्रकरणी सुभाष शंकर जाधव (वय 36, रा. झरे, ता. करमाळा) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्यादीवरुन कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल पोपट, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे आणि चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले.आरोपीचा शोध घेत असताना, दिनांक 30 ऑक्टोबर रोजी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, आरोपी तेजस संजय काळे हा त्याच्या पांढर्या रंगाच्या कारने अहिल्यानगर ते मिरजगाव रोडने चालला आहे. माहिती मिळताच पथकाने बनपिंप्री गावच्या शिवारात सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी 5 लाख 30 हजार रुपये किंमतीची कार आणि तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त केले. पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.
Ahilyanagar Crime News :पैशाच्या वादातून एकाचा खून ; 19 वर्षीय आरोपी जेरबंद
- Advertisement -


