Friday, October 31, 2025

Ahilyanagar crime news:संतापजनक! नराधम बापानेच केला मुलीवर अत्याचार

बोधेगाव: जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शेवगाव तालुक्यात उघडकीस आली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 24 तासात आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या. चाकुचा धाक दाखवत उसाच्या शेतात पिडित मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अत्याचार केल्यानंतर पित्याने धूम ठोकली. मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढत गजाआड केले.

अल्पवयीन मुलगी व आईला आरोपी नशेत नेहमी मारहाण करुन घाणघाण शिविगाळ करत होता. विवाहित मुलगी व जावई घरी आल्यानंतर त्याच्याशीही आरोपीने भांडण केले. त्यामुळे विवाहित मुलगी पतीसह सासरी गेली. त्याच रात्री आरोपीचा अवतार पाहून आई व पिडिता घाबरून नातेवाईकाकडे सहार्‍यासाठी गेले.नशेतील आरोपी पिता नातेवाइकाच्या घरी गेला. नातेवाईकाच्या कुटुंबातील महिलेस चाकूचा धाक दाखवत ‘माझ्या मुलीला तुझ्या घरी का ठेवले?,अशी विचारणा केली. ते पाहून नातेवाईक महिला घाबरून पळाली.

त्यानंतर पित्याने पिडित मुलीचा हात धरून तिला बळजबरीने उसाच्या शेतात नेत अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी पित्याच्या हाताला चावा घेत पिडितेने पळ काढला अन् घडलेली घटना नातेवाईक महिलेला सांगितली. त्यानंतर पिडितेच्य आईने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles