Sunday, February 22, 2026

Ahilyanagar crime News : धक्कादायक! काका व चुलत भावाकडून तरुणाची हत्या

सोनई-कांगोणी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश दत्तात्रय वडघुले (वय 36) रा. वडघुले वस्ती, कांगोणी रोड, सोनई हा जुन्या घरी आल्याच्या कारणावरून आरोपींनी कोयता, लोखंडी पाईप, शेतीसाठी लागणारे खोरे व लाकडी ठोकळ्याने डोक्यात मारले. यात गणेश वडघुले हा ठार झाला. फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद हिराबाई दत्तात्रय वडघुले (वय 60) रा. वडघुले वस्ती यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली.हिराबाई दत्तात्रय वडघुले यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विठ्ठल रंगनाथ वडघुले, भगवान विठ्ठल वडघुले, संभाजी विठ्ठल वडघुले, गौरी भगवान वडघुले सर्व रा. कांगोणी रोड, सोनई यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 118(1), 115(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे पुढील तपास करत आहे. दरम्यान काल आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विठ्ठल वडघुले, भगवान वडघुले, संभाजी वडघुले यांना दोन दिवस पोलीस कोठडी तर गौरी वडघुले हिस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles