पारनेर-जुन्या वादातून दारूच्या नशेत भाच्याने केलेल्या मारहाणीत चुलत मामाचा झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील जवळा येथे शनिवारी (दि.18) घडली. गोरख विठ्ठल गोरे (वय 60, रा. जवळा (कुंभार गल्ली) असे मृताचे नाव आहे. याबाबत अनिल सुदाम गोरे (वय 28, रा. जवळा) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी भाऊसाहेब बबन दरेकर (वय 44, रा. जवळा, कुंभार गल्ली) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी भाऊसाहेब दरेकर व गोरख गोरे यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. जुन्या वादातूनच शनिवारी आरोपी भाऊसाहेब दरेकर याने मामा गोरख गोरे यांना लाथा-बुक्क्यांनी, तसेच काठीने मारहाण केली. फिर्यादी अनिल गोरे याने आरोपीच्या तावडीतून गोरे यांची सुटका केली. त्यांच्या घरी नेऊन सोडले. काही वेळाने आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन ‘तुम्ही गोरखच्या सरपणाची तयारी ठेवा. मी त्याला मारून टाकणार आहे’, अशी धमकी दिली.
त्यानंतर गोरख मोरे घरातून बाहेर न आल्याने त्यांना पाहण्यासाठी फिर्यादी गेले असता, गोरख मोरे मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली होती. नातेवाइकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


