विक्रम एडके, वैभव ढूस, प्रियांका कर्णिक यांचा सहभाग
अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाची वसंत व्याख्यानमाला 13 मे 2025 पासून
नगर- अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने मंगळवार दि.13 मे ते गुरुवार दि.15 मे या कालावधीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याखानमालेत विक्रम एडके,प्रसिद्ध लेखक वैभव ढूस,प्रियांका कर्णिक विविध विषयावर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली.
ही व्याख्यानमाला रोज सायंकाळी 6 वा. नेता सुभाष चौक चितळे रोडवरील वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होईल. व्याख्यानमालेचे उद्घाटन मंगळवार दि. 13 मे रोजी सायं 6 वा.मा
.रामदास शिंदे निरीक्षक जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटनानंतर व्याख्यानमालेत प्रसिद्ध लेखक अभ्यासक विक्रम एडके (पुणे) हे अपरिचित रामायण या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील.बुधवार दिनांक 14 मे रोजी फक्त 180 दिवसांमधे दीड लाख प्रतींची विक्री होणारे भारतातील एकमेव पुस्तक.एक असे पुस्तक ज्या पुस्तकाने संपूर्ण भारताला वेड लावले, लाखो तरुणांच्या आणि तरुणींच्या आयुष्यात बदल घडवुन आणला आणि महाराष्ट्रातील मागील 100 वर्षामध्ये सर्वात जास्त वेगाने विक्री होणारे आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक करून टाकणारे एकमेव पुस्तक ठरले ते म्हणजे अंतः अस्ति प्रारंभःढहश शपव ळी ींहश लशसळपपळपस प्रसिद्ध लेखक मा. वैभव ढूस (श्रीरामपूर) दुसरे पुष्प गुंफतील.गुरुवार 15 मे रोजी प्रियांका कर्णिक (पुणे) भारतीय विद्या पारंगत(एम.ए- इंडॉलॉजी Rank Holder in University ) माझी साहित्यिक वाटचाल या विषयावर तिसरे पुष्प गुंफतील.वाचनालयाच्या वसंत व्याखानमालेस रसिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन उपाध्यक्ष अनंत देसाई व दिलीप पांढरे, सहकार्यवाह डॉ. राजा ठाकूर, खजिनदार तनवीर खान,संयोजक किरण आगरवाल,शिल्पा रसाळ,प्रा.ज्योती कुलकर्णी,सदस्य,निमंत्रित सदस्य यांनी केले आहे.


