Saturday, November 1, 2025

अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या डब्यातील पोळीभाजीचा घेतला आनंद

*पोलीस कर्मचाऱ्यांच्या डब्यातील पोळीभाजीचा* *पोलीस अधीक्षकांनी* *घेतला आनंद*

*जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )*

जामखेड – पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त चौंडी बंदोबस्त करीत असताना एका झाडाखाली जेवायला बसलेले अंमलदार यांना पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आवर्जून अंमलदार यांच्या डब्यातली पोळी भाजी आनंदाने घेतली. या कृती मुळे पोलीस अधीक्षकांना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी दिसून येत आहे.

सोमनाथ घार्गे हे सध्या अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे, तसेच श्रीरामपूर येथे ते पोलिस उपअधीक्षक म्हणून देखील होते.

सोमनाथ घार्गे यांची उल्लेखनीय कामगिरी
राज्यात नांगऱ्या टोळीचा पर्दाफाश
त्यांनी राज्यभरात सराफी पेढीवर दोरडे घालणाऱ्या कुख्यात नांगऱ्या टोळीचा छडा लावला होता.

लोकाभिमुख पोलीस प्रशासन:
रायगडमध्ये असताना त्यांनी पोलीस प्रशासनाला लोकाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न केले, आणि शिस्तप्रिय आणि मितभाशी अधिकारी म्हणून ओळखले जात होते.

CCTV प्रणाली
त्यांच्या कार्यकाळात, रायगड पोलिसांच्या CCTV प्रणालीची कामगिरी सातत्याने अव्वल राहिली.

कर्मचाऱ्यांची ओळख परेड:
अहिल्यानगरात दाखल झाल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेऊन आपल्या कामाची सुरुवात केली

आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चौंडी येथे पोलीस कर्मचारी यांच्या डब्यातील पोळी भाजी घेत जेवण करीत आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles