पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी देवस्थान येथे अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेची स्थापना
अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटना श्री क्षेत्र मोहटा देवी देवस्थानच्या सेवेत — अध्यक्ष संतोष लांडे
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटना ही कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढणारी व न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून जिल्ह्यातील कामगारांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाली आहे. या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी देवस्थान येथे संघटनेची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून देवस्थान सेवेत कार्यरत असलेल्या कर्मच्याऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील तसेच भाविक भक्तांना उत्कृष्ट सेवा मिळेल. संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे म्हणाले की, “अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. कायम कर्मच्याऱ्यांच्या माध्यमातून मोहटा देवीच्या भाविक भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक वर्षांपासून कर्मचारी प्रामाणिकपणे सेवेत कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या काही प्रश्नांची सोडवणूक प्रलंबित आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रशासनाशी सकारात्मक चर्चा करू. संघटनेचा उद्देश केवळ कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे नव्हे तर भाविक भक्तांना चांगली सेवा देण्यासाठी वातावरण निर्माण करणे हाही आहे.
यावेळी किरण दाभाडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “कामगार आणि प्रशासन हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. यांच्यामधील समन्वय राखण्याचे महत्त्वाचे काम कामगार संघटना पार पाडते. संवाद आणि चर्चेद्वारे सर्व अडचणी सोडवता येतात. कर्मच्याऱ्यांच्या माध्यमातून देवस्थानचा नावलौकिक आणखी वाढेल, भक्तांची उत्तम सोय होईल, यासाठी संघटनेचे कार्य महत्त्वाचे ठरेल. असे ते म्हणाले. यावेळी किरण दाभाडे, बजरंग घोडके (माजी उपनगराध्यक्ष, पाथर्डी नगरपरिषद), संतोष भिंगारदिवे, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी, प्रशासनाचे प्रतिनिधी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोपाच्या वेळी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी अध्यक्ष संतोष लांडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “श्री क्षेत्र मोहटा देवी देवस्थान येथे जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवले जातील, तसेच देवस्थानच्या सेवेतून संघटनेचा नावलौकिक वाढेल, असेही त्यांनी प्रतिपादन केले.