स्थानिक गुन्हे शाखेकडुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सासऱ्याचा व अकोला जिल्ह्यामध्ये प्रेयसीचा खुन करुन मृतदेह जाळुन पुरावा नष्ट करणारे आरोपी जेरबंद
” मिरजगांव ता. कर्जत येथील खुनामध्ये जावई, मुलगा व सुन मुख्य सुत्रधार ”
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मिरजगांव पोलीस ठाणे मनुष्य मिसींग रजि. नंबर 06/2026 प्रमाणे खबर देणार श्री आकाश बापु गाढवे वय – 26 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांचे खबरीवरुन दिनांक 05/03/2026 रोजी दाखल आहे. सदर मनुष्य मिसींग मध्ये बापु आनंदा गाढवे वय – 60 वर्षे, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर हे बेपत्ता आहेत. नमुद मिसींगचा शोध लागलेला नसल्याने श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी सदर मिसींगमधील इसमाचा शोध घेणेबाबत किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केलेले होते.
सदर आदेशाप्रमाणे किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ दिपक मेढे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, शामसुंदर जाधव, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, सतिष भवर, महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे, सुवर्णा गोडसे, चालक भगवान दुर्योधन धुळे अशांचे पथक तयार करुन नमुद मिसींगमधील इसमाचा शोध घेणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन रवाना करण्यात आले होते.
सदर पथकाने मिसिंग इसमाचे नातेवाईकांकडे विचारपुस केली असता खबर देणार यांचेविषयी पथकास संशय निर्माण झाला. पथकाने खबर देणार आकाश बापु गाढवे याचेकडे सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्याने सुनिल रामदास राठोड व त्याचे नातेवाईकांनी मिसिंगमधील इसमाचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. सुनिल राठोड याची व्यवसायीक कौशल्याचे आधारे आरोपी हा त्याचा मित्र सचिन सारवान रा. खळवाडी, शेगाव याचे घरात असले बाबत माहिती प्राप्त झाली. पथकाने सदर ठिकाणी जावुन शोध घेत असताना आरोपी सुनिल रामदास राठोड हा पोलीसांचे नजर चुकवुन सचिन सारवान याचे घराचे पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन पळुन जाण्याचा प्रयत्न केल्याने तेव्हा त्याचे पायाला अपघाती मार लागलेला आहे. पथकाने आरोपी नामे 1) सुनिल रामदास राठोड वय – 37, रा. नानासाहेब पातुर, ता. पातुर, जि. अकोला, हल्ली – रा. आंबेठाण रोड, चाकण, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता. त्याने कळविले की, तो तसेच 2) आकाश बापु गाढवे, 3) पायल उर्फ आकांक्षा आकाश गाढवे दोन्ही रा. रमजान चिंचोली, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, 4) प्रथमेश उर्फ भावेश दिगंबर चांदुरकर (फरार), 5) अमोल भिकाजी लाटकर (फरार) दोन्ही रा. पुनोती, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला यांना मयत नाते बापु आनंदा गाढवे वय – 60 वर्षे, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांची शेतजमीन विकुन पैसे घ्यावयाचे होते परंतु मयत हे शेतजमीन विकु देत नव्हते त्या कारणावरुन दिनांक 04/01/2026 रोजी दुपारी 01.30 ते 02.00 वा. चे सुमारास मयताचे राहते घरामध्ये मयताचे तोंडावर उशी ठेवुन त्यांचे तोंड दाबुन व गळा आवळुन त्यांचा खुन करुन घराजवळील लाकडे गोळा करुन डिझेलचे सहाय्याने प्रेत जाळुन टाकले असल्याची कबुली दिली आहे. वरील आरोपी क्र. 02 ते 05 यांचा शोध घेता त्यापैकी आकाश बापु गाढवे रा. रमजान चिंचोली, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर हा मिळुन आलेला आहे.
तसेच सुनिल रामदास राठोड वय – 37, रा. नानासाहेब पातुर, ता. पातुर, जि. अकोला, हल्ली – रा. आंबेठाण रोड, चाकण, पुणे यास विश्वासात घेवुन आणखी विचारपुस करता त्याने कळविले की, शितल लिंबाजी सोंगेवाड, रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी हिचेसोबत प्रेमसंबंध होते. शितल ही त्याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे कारणावरुन तिस दिनांक 16/11/2025 रोजी ठार मारुन तिचे प्रेत धनेगांव, ता. बाळापुर, जि. अकोला परिसरामध्ये अर्धवट जाळुन टाकले असल्याची कबुली दिली आहे. आरोपीने दिलेल्या कबुलीवरुन बाळापुर पोलीस ठाणे, जि. अकोला, गु.र.नं. 574/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा उघडकीस आलेला आहे.
वरील आरोपींनी मयत नामे बापु आनंदा गाढवे वय – 60 वर्षे, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर याचा खुन केल्याचे निष्पन्न केले असुन आरोपीविरुध्द पोउपनि/दिपक पांडुरंग मेढे पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगांव पोलीस ठाणे, अहिल्यानगर गु.र.नं. 87/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 238, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मिरजगांव पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


