Friday, October 31, 2025

ई-केवायसी न केल्यास धान्य पुरवठा बंद अन्न पुरवठा विभागाचा शिधापत्रिकाधारकांना इशारा

अहिल्यानगर -मार्चअखेर नेवासा तहसीलमधील 67.80 टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे. आता ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार नसल्याचे पुरवठा तपासणी अधिकारी सुदर्शन दुर्योधन यांनी सांगितले. श्री. दुर्योधन म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठीही हे पाऊल उचलण्यात आले आहे. नेवासा तालुक्यात स्वस्त धान्याची एकूण 151 शासकीय दुकाने असून, त्याद्वारे लाभार्थ्यांना धान्यवाटप केले जाते. प्राधान्य कुटुंबातील एकूण लाभार्थ्यांची संख्या एक लाख 90 हजार आहे. तहसीलमध्ये एकूण 7 हजार 163 ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.अंत्योदय हे शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी 7 हजार 50 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा 35 किलो धान्याचा लाभ मिळत आहे. यामध्ये आणखी 113 अंत्योदय शिधापत्रिकाधारक जोडले जाऊ शकतात. यामध्ये अपंग, दुर्धर आजारी, परित्यक्ता आणि विधवा यांना 35 किलो धान्य देण्यात येणार आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनकार्ड बंद होईल. नेवासा तहसील कार्यालयात ज्या नागरिकांकडे ई-श्रम कार्ड आहे. परंतु रेशनकार्ड नाही, अशा नागरिकांनी ई-श्रम कार्डसह नेवासा तहसीलमधील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा. त्यांना शिधापत्रिका देण्यात येणार आहेत,झ असे सुदर्शन दुर्योधन यांनी सांगितले.

ई-केवायसी न केल्यास रेशन मिळणार नाही. तसेच नाव रेशनकार्डमधूनही काढले जाऊ शकते. यासाठी लाभार्थी ‘मेरा राशन’ या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने घरबसल्या केवायसी करू शकतात. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2025 असल्याचे सुदर्शन यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles