Saturday, November 1, 2025

दोन महिलांना पिकअपची धडक, एक जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी

खर्डा येथे भरधाव पिकपची दोन पादचारी महिलांना धडक, एकीचा मृत्यू एक गंभीर जखमी,

पोलिसांनी गाडी ड्रायव्हर पाठलाग करून पकडला..

जामखेड ( प्रतिनिधी – नासीर पठाण )

जामखेड – खर्डा येथील स्मिता दिलीप रणभोर व वर्षा प्रकाश दिंडोरे या दोघी पहाटे फिरण्यासाठी भूम रोडला चालत होत्या त्यावेळी त्या माघारी खर्डाकडे येत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या पिकप M H -14 – M H 0135 या गाडीने रणभोर व दिंडोरे यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये स्मिता रनभोर यांचा जागेवरच मृत्यू झाला तर शेजारी चाललेल्या त्यांच्या सहकारी दिंडोरे यांनाही वाहनाची धडक बसली व त्या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या या घटनेत त्याही गंभीर जखमी असून त्यांना तातडीने अहिल्यानगरला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कै. स्मिता रणभोर अतिशय कष्टाळू महिला म्हणून ओळखले जात होत्या, त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता त्यांच्या दुःखद निधनाने खर्डा शहरावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हा अपघात झाल्यानंतर पिकप चा ड्रायव्हर याने घटनेवरून पुढे जामखेड मार्गे पलायन केले. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांनी तातडीने तपासाचे चक्रे फिरवून व सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालेल्या गाडीचा नंबरचा तपास लावून खर्डा पोलिसांनी त्याला मिरजगाव येथून गाडीसह ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles