चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे मा सभापती मीनाताई चोपडा यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
विकासाच्या गाड्याला जो वेग आला आहे तो टिकून ठेवण्याचे काम नागरिकांच्या हातात – आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर : आपला देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. या कार्यकाळात शहर विकासासाठी एवढा मोठा निधी कधी मिळाला नव्हता, मंजूर करून आणलेली विकास कामे अंतिम टप्प्यात आली आहे. काही राजकीय स्वयंघोषित पुढारी या कामांवर टीका करत आहे, तर त्यांचे कामच असते विरोध करणे, आणि टीका करणे. काल्पनिक चित्र उभा करून बोलत राहणे तरच ‘ते’ लोकांना आकर्षित करू शकतात, पण तशी परिस्थिती राहिली नाही. आता नगरकर ही हुशार झालेले आहे. मी महापालिका, विधानसभा, लोकसभा अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत च्या निवडणुका लढवल्या आहेत. ज्यांना समाजामध्ये किंमत नाही त्यांना जास्त महत्त्व दिले नाही. महाराष्ट्रात असे वाचाळ वीर लोक आहेत त्यांच्याकडे जनता मनोरंजनाने पहात असतात. शहरातील कॉलनी पासून ते डीपी रस्त्यापर्यंत कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी निधी आणला आहे. उपनगरातील बहुतांश रस्त्यांची कामे राज्य शासनाच्या निधीमधून पूर्ण देखील झाली आहे. काही कामे करायची बाकी आहेत. ते देखील मंजूर आहेत मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे सुरू असून जनतेला अडचण निर्माण झाली आहे. परंतु कामे करीत असताना ठेकेदाराला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता एकदा काम केल्यानंतर पुन्हा ते करण्याची गरज भासणार नाही, थोड्या दिवस त्रास सहन करा कायमस्वरूपी चे प्रश्न मार्गी लागले जातील. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे मा सभापती मीनाताई चोपडा यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. संग्राम जगताप, मा. उपमहापौर गणेश भोसले, मा. नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, डॉ. बलराज पाटील, सीए अशोक पितळे, अभय कांकरिया, संजय ताथेड, राजू शेटिया, बाळू धाडीवाल, संजू गुंदेचा, किशोर डागा, सावन गुगळे, संदीप शिंगवी, डॉ. अजय देशमुख, प्रतीक पाचपुते, विशाल दाभाडे, दिनेश भंडारी, गौरव झवर आदीसह नागरिक उपस्थित होते.
गुरुवर्य राजाभाऊ कोठारी म्हणाले की, पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगत असतात, आणि जात असतात त्यामुळे विरोधांकडे लक्ष न देता शहर विकासाची कामे मार्गी लावावी. आमदार संग्राम जगताप यांनी विकासाचा रथ सुरू केला आहे. त्या रथाचा वेग मंदावता कामा नये. शहरामध्ये रस्त्यांची कामे सुरू आहे त्याचा त्रास आपल्याला होत आहे, तो त्रास काही दिवस सहन करायचा आहे. त्या मुळे खेड्याची ओळख पुसून महानगराची ओळख निर्माण होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या दूरदृष्टीमुळे शहर बदलत असून त्या विकास कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे ते यावेळी म्हणाले.
सीए अशोक पितळे म्हणाले की, आम्ही लहान असताना शहरांमध्ये कुठलेही काम नव्हते मात्र! आमदार संग्राम जगताप यांनी पुढील ५० वर्षाचे काम केले आहे. एवढी मोठी कामे करणे हे २५ वर्ष काम करणाऱ्यालाही जमत नाही. तुम्ही प्रस्ताव तयार करण्यापासून ते मंजुरी मिळवत कामे केले आहे. आमदार संग्राम जगताप यांची शहरी विकासासाठी असणारी टीम देखील चांगली आहे. ठेकेदार प्रशासनाने देखील उत्कृष्ट दर्जेची कामे करून घ्यावी कारण या कामा पाठीमागे आमदार संग्राम जगताप यांचे नाव जोडलेले आहे. असे ते म्हणाले.
शहरात चांगले काम करणारी नगरसेवकांची टीम आहे. त्या माध्यमातून नागरिकही समाधानी असून विकास कामावर बोलू लागली आहे. ते ऐकायला मिळत असून विकसित नगर निर्माण होत आहे. ही जनभावना निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका होणार असल्याने इच्छुकांच्या संख्या देखील वाढल्या आहेत. आता कार्यक्रमाला दिसायला लागले आहे. हे लोक ५ वर्षे गायब असतात. त्यांचे समाजामध्ये योगदान काय आहे?हे नागरिकांनी देखील लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्याला ५ वर्षे सेवा देण्याचे काम कोणी केले? विकासात्मक काम कोण करते हे लक्षात ठेवले पाहिजे. सेवा देणारी मंडळी निवडून दिली पाहिजे. शहरात विकास कामे सुरू आहे. जर वेगळ्या विचाराचे लोक आले तर शहर विकास थांबला जाईल. यासाठी अशा लोकांना बाजूलाच ठेवले पाहिजेत विकासाच्या गाड्याला जो वेग आला आहे तो टिकून ठेवण्याचे काम नागरिकांच्या हातात आहे. आपल्याला थेट विमानतळापर्यंत आपला विकास घेऊन जायचं आहे अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
आदर्श कॉलनीतील दोन्ही रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे. या दोन्ही रस्त्यांना कुंदन कांकरिया व राजेंद्र मुनोत पथमार्ग असे नामकरण करायचे आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याची कामे प्रलंबित होती ते आता मार्गी लागत आहे त्यामुळे कॉलनीतील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी व्यक्त केले.


