Tuesday, March 3, 2026

आ.संग्राम जगताप म्हणाले……भविष्यात जिहाद्यांपासून हिंदूंना मोठा धोका

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मोघालांशी संघर्ष केला त्याचप्रमाणे आता आपल्या पुढेही जीहाद्यांशी संघर्ष करण्याचे अव्हान आहे. आजपर्यंत समाजात धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालून काम करणाऱ्यांमुळेच या जीहाद्यांचे फावले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या धर्मनिरपेक्षांपासूनही आपण लांब राहिले पाहिजे. हिंदू विरोधातील या जीहाद्यांचे षडयंत्र वेळीच ओळखा. भविष्यात यांच्या पासून हिंदूंना फार मोठा धोका आहे; म्हणून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र या. प्रत्येक गावागावात संजय मरकड यांचासारखा सरपंच तयार होणे आवश्यक आहे व प्रत्येक यात्रेत, गावात त्यांना बंदी होणे आवश्यक आहे. आपले देवस्थान सुरक्षित राहण्यासाठी मरकडांनी घेतलेला हा निर्णय असाच वर्षानुवर्षे पुढे चालला पाहिजे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

श्री क्षेत्र मढी गावातील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लीम समाज्याच्या नागरिकांना दुकाने लावू न देण्याच्या निर्णयाचे समर्थन करून पाठींबा देण्यासाठी रविवारी झालेल्या विराट हिंदू सभेत अहिल्यानगरचे आ.संग्राम जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिंदुत्ववादी आ. महेश लांडगे, आ. मोनिका राजळे, श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग, हभप अशोक पालवे महाराज, मढी गावचे सरपंच संजय मरकड आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मढी पंचोक्रोशी तील नागरिकांसह अहिल्यानगर शहरातील हिंदू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी हिंदूत्ववादाच्या जोरदार घोषणा दिल्या.

आ.जगताप पुढे म्हणाले, अनेकदा प्रशासनानेही एकतर्फी निर्णय घेत धर्मनिरपेक्षांसारखे हिंदुंवर अन्याय करण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा सेक्युलर प्रशासनाचा मी निषेध करतो. प्रशानासने जर आठ दिवसात त्यांची अनधिकृत कामे पाडली नाहीत तर अधिवेशन संपल्यावर मी व आ.महेश लांडगे येथे येऊन ती पाडू. प्रशासनाने आम्हाला प्रवृत्त करू नका. मढीच्या यात्रेत जे लोक अंघोळ करत नाहीत, कपाळी कुंकू लावत नाहीत, प्रसाद खात नाही अशा मुस्लिमांना दुकाने लाऊ न देण्याचा निर्णय सरपंच संजय मारकड यांचा योग्यच आहे. त्यांच्या देवस्थान जवळ एकाही हिंदूला ते दुकान लाऊ देत माहित. मग आपण का त्यांना जवळ करायचे. याचा विचार सर्व हिंदूंनी करावा. हिंदूंकडूनच हिंदूंनी खरेदी करावी असे वारंवार सांगत आहोत. आता आपल्या मुलामुलींचा हिंदू रिक्षावाला, क्लासचे शिक्षकही हिंदूच असावा याकडे लक्ष द्या. यावेळी आ.महेश लांडगे, आ.मोनिका राजळे यांनीही मनोगत व्यक्त करून सरपंच संजय कारकड यांचे समर्थन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles