अहिल्यानगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत आज (मंगळवार, 11 नोव्हेंबर) महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे आता महापालिका निवडणुकीच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली असून, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असलेल्या इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे.आरक्षण सोडतीमुळे आता संबंधित प्रभागांमधील राजकीय समीकरणे आणि भविष्यातील लढतीचे स्वरूप स्पष्ट होऊ लागले आहे. काही विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांच्या पदरी अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने निराशा आली आहे, तर काहींना यामुळे नवी संधी मिळाली आहे. आरक्षण निश्चित होताच अनेक इच्छुकांनी त्वरित आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
प्रभाग निहाय आरक्षण तपशील (अहिल्यानगर महापालिका)
प्रभाग 1: या प्रभागात अ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली आहे. ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी, तर क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे. ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 2: प्रभाग 2 मध्ये अ जागा अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असून, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)साठी आहे. क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आणि ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 3: या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी, ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 4: प्रभाग 4 मध्ये अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी तर ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाली आहे. क जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 5: प्रभाग 5 मध्ये अ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आहे. क जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून, ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे.
प्रभाग 6: या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित असून, ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 7: प्रभाग 7 मध्ये अ जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित झाली आहे. ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी असून, क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे. ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 8: या प्रभागात अ जागा अनुसूचित जाती (एससी) महिलांसाठी, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी आरक्षित झाली आहे. क आणि ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहेत.
प्रभाग 9 : प्रभाग 9 मध्ये अ जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित असून, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी आहे. क जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे.
प्रभाग 10: या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाली आहे. ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 11: प्रभाग 11 मध्ये अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाली आहे. ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून, ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 12: या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी आरक्षित झाली आहे. ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून, क आणि ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहेत.
प्रभाग 13: प्रभाग 13 मध्ये अ जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित असून, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी आहे. क जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 14: या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित असून, ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 15: प्रभाग 15 मध्ये अ जागा अनुसूचित जाती (एससी) महिलांसाठी आरक्षित झाली आहे. ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी असून, क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे. ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 16: या प्रभागात अ जागा अनुसूचित जाती (एससी) महिलांसाठी, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी आरक्षित झाली आहे. क आणि ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहेत.
प्रभाग 17: प्रभाग 17 मध्ये अ जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित असून, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी आहे. क जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर ड जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे.


