Saturday, February 21, 2026

दुरावस्थेमुळे बंद असलेले केडगाव भाग्योदय मंगल कार्यालय नागरिकांसाठी खुले होणार

आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर महानगरपालिकेकडून केडगावात कार्यालय स्वच्छता अभियान

दुरावस्थेमुळे बंद असलेले भाग्योदय मंगल कार्यालय नागरिकांसाठी खुले होणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालयाची दुरावस्था झाली आहे. कोविड काळापासून ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. आमदार संग्राम जगताप यांनी हे कार्यालय पुन्हा नागरिकांसाठी खुले होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी महानगरपालिकेने स्वच्छता अभियान राबवून हे कार्यालय स्वच्छ केले. तेथील किरकोळ दुरुस्तीची कामे करून लवकरच हे कार्यालय नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

कोविड काळापासून भाग्योदय मंगल कार्यालय बंद अवस्थेत आहे. तेथे विद्युतीकरण व काही दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. तसेच, तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. तेथील नागरिकांनी कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी आमदार जगताप यांच्याकडे केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार या कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी मंगळवारी अभियान राबविण्यात आले. तेथील सर्व प्रकारचा कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. तसेच, जेटिंग मशिनच्या माध्यमातून संपूर्ण कार्यालय धुवून स्वच्छ करण्यात आले. परिसरातील नागरिकांनीही यात सहभाग घेतला. दरम्यान, कार्यालयाचे शटर, विद्युतीकरण व इतर किरकोळ दुरुस्त्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात येईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles