अहिल्यानगर -महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. त्यात पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने काहींनी पक्षांतर केले. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोघांवर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी कारवाईचा बडगा उगारला असल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी आकाश कातोर यांच्या मातोश्री आशाबाई लोभाजी कोतोरे यांनी प्रभाग आठ मधून भाजपकडून उमेदवारी केली आहे. तसेच युवा सेनेचे पदाधिकारी महेश लोंढे यांनी प्रभाग नऊ मधून आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहे. कातोरे, लोंढे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे हकालपट्टीची कारवाई केली आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक म्हणजेच ५४ उमेदवार दिले आहेत. यातील निवडणुकीच्या रिंगणात किती जण राहितील हे उमेदवारी अर्ज माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे. काही उमेदवारांच्या एबी फॉर्म वर खाडाखोड झाल्यामुळे उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अशा उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.


