सारसनगरमध्ये प्रचारासाठी खासदार लंके मैदानात
महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी : महाविकास आघाडीची सारसनगरमधून प्रचार रॅली
अहिल्यानगर- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सारसनगर परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण घोषणांमुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या वातावरणाने दणाणून गेला.
या प्रचार रॅलीत खासदार निलेश लंके यांनी स्वतः सहभाग घेत मतदारांशी थेट संवाद साधला. घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे आणि सर्वसामान्यांच्या हिताचे काम करणारे नेतृत्व महाविकास आघाडीकडे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रोहन रमेश शेलार (अ), कल्याणी महेंद्र गाडळकर (ब), अर्चना सुरेश गायकवाड (क) आणि चंद्रकांत आनंद उजागरे (ड) यांच्या प्रचारासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन केले.
या रॅलीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, माजी नगरसेवक संजय झिंजे, मतीन शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगरसोलापूर रोड, कोंबडीवाला मळा तसेच सारसनगर परिसरातून ही प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान नागरिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला.
अहिल्यानगर मनपा निवडणुक ; सारसनगरमध्ये महाविकास आघाडीची प्रचार रॅली खासदार लंके म्हणाले….
- Advertisement -


