अहिल्यानगर महापालिका निवडणूक; सहा भरारी, सात स्थायी पथकांची नियुक्ती

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता पालनासाठी सहा भरारी पथके व सात स्थायी पथकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महापालिका क्षेत्रात तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या दिनांक व वेळेपासून ही आचारसंहिता लागू असून, निकाल जाहीर होईपर्यंत ती प्रभावी राहणार आहे. निवडणूक काळात कोणतेही उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शहरात प्रवेश करणार्‍या प्रमुख सात रस्त्यांवर स्थायी पथके नेमण्यात आली आहेत.राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महापालिका क्षेत्रात तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या दिनांक व वेळेपासून ही आचारसंहिता लागू असून, निकाल जाहीर होईपर्यंत ती प्रभावी राहणार आहे. निवडणूक काळात कोणतेही उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शहरात प्रवेश करणार्‍या प्रमुख सात रस्त्यांवर स्थायी पथके नेमण्यात आली आहेत.
केडगाव, दौंड रस्ता, कल्याण रस्ता, मनमाड रस्ता, छत्रपती संभाजीनगर रस्ता, पाथर्डी रस्ता आणि सोलापूर रस्ता या मार्गांवर ही पथके कार्यरत राहणार असून, शहराच्या हद्दीत येणार्‍या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यापैकी तीन पथके दिवसा तर तीन पथके रात्री कार्यरत राहणार आहेत. ही पथके आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कारवाई करणार आहेत.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आधारेच मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार शहरात एकूण 345 मतदान केंद्रे राहणार असून, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी ज्या ठिकाणी मतदान केंद्रे होती, त्याच ठिकाणी यावेळीही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही डांगे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles