Friday, February 20, 2026

अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचाच महापौर होणार – माजी उपमहापौर गणेश भोसले

सारसनगर प्रभाग क्रमांक 14 चे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या प्रयत्नातून सिदाजी आप्पा मंदिर परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचाच महापौर होणार – माजी उपमहापौर गणेश भोसले

अहिल्यानगर : प्रभाग क्रमांक 14 हा शहरांमध्ये विकसित प्रभाग म्हणून ओळखला जात आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकासकामे मार्गी लावली आहे सारसनगर या भागामध्ये पूर्वी तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई होती, या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता, आम्ही सर्वांनी नियोजन करून फेज टू पाणी योजने द्वारे पाणी दिले, आज सारसनगर हा परिसर टँकर मुक्त झाला आहे, याचबरोबर या परिसरातील ९०% रस्ते कॉंक्रिटीकरणाने जोडले असून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे, प्रभाग क्रमांक 14 मध्ये नगरकर राहण्यासाठी पसंती देत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती देखील वाढत आहे अहिल्यानगर शहर हे विकास कामातून बदलत असल्यामुळे नगरकर महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचाच महापौर बसवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले आहे
सारसनगर प्रभाग क्रमांक 14 चे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या प्रयत्नातूनसिदाजी आप्पा मंदिर परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले, यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, माजी नगरसेविका शितल जगताप व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की प्रभागातील नागरिकांनी एका विचाराचे नगरसेवक निवडून दिले असल्यामुळे या भागाचा विकास कामातून कायपालट झाल्याचे पहावयास मिळत आहे पुढील वीस पंचवीस वर्षाचे नियोजन करून विकासाची सर्वच कामे मार्गी लावली आहे या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभले असून मूलभूत प्रश्नांपासून कामे केले असल्यामुळे आता ही कामे पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासणार नाही सिदाजी आप्पा मंदिर परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले असून लवकरच ते पूर्ण होणार आहे नागरिकांनी देखील विकास कामांमध्ये सहभागी व्हावे असे ते म्हणाले
यावेळी परिसरातील नागरिकांनी सारसनगर परिसरामध्ये झालेल्या विकास कामांचे स्वागत केले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी नगरसेविका शितल जगताप यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles