Friday, February 20, 2026

अहिल्यानगर महानगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार ,शहरातील ओढे-नाले सफाईचा पोलखोल

शहरातील ओढे-नाले सफाईचा पोलखोल

महापालिका प्रशासनाचे वराती, मागून घोडे – संपत बारस्कर

अहिल्यानगर : महानगरपालिकेचा नियोजन शून्य कारभारामुळे नगरकर विविध समस्यांना सामोरे जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ओढे नाल्यांची सफाई होणे गरजेचे होते. मात्र कुठलेही नियोजन न करता पावसाळा सुरू झाला आणि त्यानंतर महापालिकेने सफाई चे काम हाती घेतले याचा अर्थ वराती-मागून घोडे पाहिला मिळत आहे. वारुळाचा मारुती रस्त्यावरील पुलाजवळ कुठलीही साफसफाई न झाल्यामुळे सीना नदीला आलेल्या पुराचे पाणी आडले गेले त्यामुळे परिसरामध्ये सर्व दूर पाणी पसरलेले चित्र पाहायला मिळाले तसेच पुलाचे दरवाजे चिखल, झाडे-झुडपे यांच्या मुळे बंद झाले असल्यामुळे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद झाली, काही नागरिक या पाण्यातून आपला जीव मुठीत धरून प्रवास करत होते. या ठिकाणी एखादी दुर्देवी घटना घडल्याची वाट महापालिका पाहत होती का? महापालिकेने केलेल्या नाले सफाईचा दावा फोल ठरला आहे, ओढ्या नाल्यावर बांधकाम करण्याची परवानगी महापालिका देत असून त्यांचा अजब कारभार सुरूचं आहे. महापालिकेच्या नाले सफाई कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली.
सीना नदी वारुळाचा मारुती रस्त्यावरील पूल परिसरातील आलेल्या पुराची व नाले सफाईची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर समवेत माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, दीपक खेडकर, जॉय लोखंडे, राहुल कातोरे, गिरीश जगताप आदी उपस्थित होते.

(चौकट) अहिल्यानगर शहरामध्ये अतिवृष्टी सुरु असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने कुठल्याही उपयोजना केलेल्या दिसत नाही. आज आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून वारुळाचा मारुती रस्त्यावरील पुल परिसराची पाहणी केली असता महापालिका कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. या समस्यांचा त्रास शहरातील नागरिकांना भोगावे लागत आहे, प्रशासनाला कुठलेही गंभीर्य दिसत नाही! या पूर परिस्थितीमध्ये महापालिकेचा कुठलाही जबाबदार अधिकारी रस्त्यावर दिसत नाही. शासनाकडून अतिवृष्टीचे निर्देश असताना देखील यांना सरकारच्या आदेशाचे काही देणे घेणे नाही, महापालिका प्रशासनातील अधिकारी अक्षरशा गेड्याच्या कातड्याचे झालेले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सरळ करण्याचे काम केले जाईल. या अतिवृष्टीमुळे शहरातील नागरिकांचे आर्थिक नुकसान झाल्यास महापालिकेकडून भरपाई करून दिले जाईल या गलथान कारभाराचा जाब आयुक्त यांना विचारला जाईल असा इशारा माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी दिला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles