पुन्हा ‘लिंबू-टोना’चा प्रकार.
नालेगाव गाडगीळ पटांगण परिसरात भीतीचे सावट.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना शहरातील वातावरण आधीच तापलेले असतानाच, आता लिंबू-टोना व संशयास्पद हालचालींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नालेगाव गाडगीळ पटांगण येथे अपक्ष उमेदवार सोनाली अजय चितळे यांच्या घरासमोर कोहळ कापून हळदी कुंकू चा सडा पसरून शिवसेना धनुष्यबाण, मशाल व अपक्ष उमेदवार यांच्या पोम्प्लेट ठेवण्यात आला होता व परिसरात घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण खळबळ उडाली आहे. शहरामध्ये लिंबू आढळून येत असून, यामागे अंधश्रद्धा किंवा जादू-टोना प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे नालेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
उमेदवार सोनाली अजय चितळे यांच्या घरासमोर ‘लिंबू-टोना’चा प्रकार
- Advertisement -


