समृद्ध आरडे ची आईस हॉकी राष्ट्रीय खेलो इंडिया गेम साठी निवड
दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी क्रीडा व युवा सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य व आईस हॉकी राज्यसंघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर आईस हॉकी खेळाच्या निवड चाचणीचे आयोजन निगडी, पुणे येथे करण्यात आले होते, सदर निवड चाचणी साठी जिल्हयाच्या वतीने समृद्ध दीपक आरडे या खेळाडूने निवड चाचणीत सहभाग घेतला होता, त्याच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याची निवड लेह -लद्दाख येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी झाली आहे. समृद्ध हा स्केटिंग खेळाचा उत्कृष्ट खेळाडू असून त्याने यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये आपलं सहभाग नोंदवुन नेत्रदिपक कामगिरी केली आहे. वयाच्या पाच वर्षापासून त्यास बुरुडगाव रोड येथील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या मैदानावर स्केटिंग या खेळाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन- राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री. सतीश गायकवाड यांच्याकडून मिळत आहे. समृद्ध हा दीपक आरडे
उपशिक्षक,सीताराम सारडा विद्यालय (मा.चेअरमन हिंद सेवा मंडळच्या सेवकांची पतपेढी) यांचा मुलगा आहे.
त्याच्या निवडी बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री. ज्ञानेश्वर खुरंगे, राष्ट्रीय खेळाडू श्री. सतिश गायकवाड, राज्य संघटनेचे सचीव श्री प्रशांत चव्हाण सर, शेख असीफ, ऑलम्पिक असोसिएशनचे श्री. शैलेश गवळी, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचीव श्री. संजयजी साठे तसेच श्री.महेंद्र हिंगे सर , श्री. अविनाश काळे यांनी त्याचे अभिनंदन करुन पुढिल स्पर्धेस शुभेच्छा दिल्या


