माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील गुरू पुण्यातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शैलेश पाटकर यांच्यासमोरच डॉ. विखे यांनी ही फटकेबाजी केली. डॉ. विखे न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे धडे डॉ. पाटकर यांनी केले आहेत. अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात ही गुरूशिष्याची जोडी पाहुणे म्हणून एकाच व्यासपीठावर आली होती. डॉ. पाटकर यांनी डॉ. विखे यांचा आपला शिष्य असा उल्लेख केला.
विखे म्हणाले, डॉ. पाटकर यांनी मी त्यांचा विद्यार्थी असलेले अहिल्यानगरमध्ये येऊन सांगितले हे बरे झाले. माझ्या वैदयकीय डिग्रीवर संशय घेऊन टीका करणाऱ्यांना आता उत्तर मिळाले असेल. मी खरोखरच न्यूरोसर्जन आहे याची आता विरोधकांची खात्री पटली असेल. सुरवातीच्या काळात वैद्यकीय सेवा करताना आपण रुग्णांना वास्तववादी सल्ले देत होतो. मात्र, काही लोकांनी त्याचा उलटा अर्थ घेतला. पुढे मी वैद्यकीय व्यवसाय सोडून राजकारणात आलो. राजकारणातील डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करावी, असा यामागे उद्देश होता. त्यादृष्टीने सुरवात केली. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. या पराभवातून मी सावरलो आहे. आता पुन्हा वैद्यकीय व्यवसायात जाऊन लोकांची सेवा करण्याचा विचार करतो. राजकारण असो की वैद्यकीय व्यवसाय आपण जाहिरातबाजीत कमी पडलो. त्यामुळे उलटा प्रचार अधिक झाला. मात्र, जाहिरातीपेक्षा कृतीला जास्त महत्व असते, येणाऱ्या काळात दिसून येईलच, असेही डॉ. विखे म्हणाले.
मॅककेअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत. त्याचे उद्घाटन या न्यूरोसर्जन मंडळींच्या हस्ते करण्यात आले.



दादा तुमच्या वैद्यकीय क्षेत्राचा अहिल्यानगर जिल्ह्यात झाला तर लोकांना मुंबई पुणे जाण्याची गरज भासणार नाही. मंगेशकर, लिलावती आदीत्य बिर्ला यासारख्या हॉस्पिटलच्या सुविधा तुम्ही जिल्ह्यात द्यावे. तसा तुम्ही पराभवाचा वचपा संगमनेर व पारनेरला काढलाच आहे.