बुर्हाणनगर येथे पांचाळ सुतार समाजाच्यावतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
नगर : बुर्हाणनगर, नागरदेवळे परिसरात विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मोठ्या संख्येने असून गुण्यागोविंदाने राहत आहे. अतिशय धार्मिक वृत्तीचा असल्याने या समाजाकडून नेहमीच विविध कार्यक्रम घेतले जातात. या समाजाला विश्वकर्मा मंदिर उभारणीसाठी ग्रामपंचायतीमार्फत योग्य जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मंदिरासाठी आवश्यक सहकार्य करू, अशी ग्वाही भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
नगर तालुक्यातील बुर्हाणनगर येथे राधाकृष्ण मंदिरात भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय कर्डिले बोलत होते. याप्रसंगी सरपंच रावसाहेब कर्डिले, संदीपदादा कर्डिले, नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, सुशिल तापकिरे आदी उपस्थित होते. जयंती निमित्त हभप शंकर महाराज गणगे यांनी किर्तन सेवा दिली. त्यांना हरिहर वारकरी शिक्षण संस्था मल्लिनाथ महाराज सूर्यवंशी, निंबळक यांनी साथ दिली. मुख्य पूजेचे यजमान वनिता व बालाजी कलमदाणे होते. किर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.

या सोहळ्यासाठी हभप आशाताई गरूड, हभप मोहिते महाराज, हभप रामभाऊ खर्से, शामराव कलमदाणे, किशोर दुधाले, सुभाष दुधाले, दशरथ कलमदाणे, राजेंद्र कलमदाणे, साईनाथ दुधाले यांचै मार्गदर्शन तर हभप संतोष महाराज कलमदाणे, गोकुळ कलमदाणे, संतोष दुधाले, कन्हैया कलमदाणे, दत्तात्रय नगरकर, अरूण जमदाड, युवराज दुधाले, विश्वकर्मा समाजाचे शहराध्यक्ष देवेंद्र दुधाले, बाणेश्वर कलमदाणे, संतोष दुधाले, ईश्वर दुधाले, शंकर कलमदाणे, गणेश दुधाले, साईबाबा दुधाले, शिवाजी धरणकर, संतोष धरणकर, लक्ष्मण ता़ंबट, रामेश्वर तांबट, अविनाश कलमदाणे, रवी धरणकर, शिवदीप कलमदाणे, योगेश दुधाले, राहुल दुधाले, वैभव दुधाले, शुभम दुधाले, गौरव दुधाले, अमृत क्षीरसागर, रामदास सुरंगकर, अभिषेक कलमदाणे, अक्षय कलमदाणे, विनायक क्षीरसागर, घनश्याम वाकचौरे, रमेश सरोदे, शिवाजी कलमदाणे, सोमनाथ झेलकर, ओंकार तांबट, महेश नगरकर, शुभम तांबट आदींसह समाजबांधवांना कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


