Saturday, February 21, 2026

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक 21-02–2026 एकुण कांदा गोणी -93,002

लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 1000 ते 1300
2 नंबर= 700 ते 1000
3 नंबर= 400 ते 700
4 नंबर= 200 ते 400

चांदणी चौकात तरुणाला मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर – शहरातील चांदणी चौक परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि इलेट्रिक केबलने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अनिकेत शिंदे याच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब सुखदेव कांबळे (वय ४२, रा. उक्कडगाव) हे १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास चांदणी चौक परिसरातून जात होते. यावेळी आरोपी अनिकेत शिंदे आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच जणांनी संगनमत करून कांबळे यांना अडवले. ममागील भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी कांबळे यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.भांडणाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. आरोपींनी कांबळे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतयावरच न थांबता, एका आरोपीने काळ्या रंगाच्या इलेट्रिक केबलचा वापर करून कांबळे यांच्यावर सपासप वार केले. यावेळी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. जखमी अवस्थेत कांबळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णांलयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस हवालदार इनामदार करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles