onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक 19-03–2026 एकुण कांदा गोणी -60,167
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 950 ते 1600
2 नंबर= 600 ते 950
3 नंबर= 300 ते 600
4 नंबर= 150 ते 300
नोंदणी व मुद्रांक कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू
दस्त नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन
अहिल्यानगर-आर्थिक वर्ष 2025-26 मधील मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासोबतच दस्त नोंदणीसाठी वाढत असलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मुद्रांक व नोंदणी कार्यालये आता शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेंद्र महाबरे यांनी ही माहिती दिली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली दस्त नोंदणीची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 एप्रिल 2026 पासून नवीन बाजारमूल्य (रेडी रेकनर) दर तक्ता लागू होणार असून स्थावर मालमत्तांच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच दस्त नोंदणी पूर्ण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी मार्च महिन्यात नोंदणी कार्यालयांकडे होत असते. यंदा देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष पाऊल उचलले आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी 26 मार्च, 28 मार्च तसेच 29 ते 31 मार्च 2026 या शासकीय सुट्टीच्या दिवसांमध्येही जिल्ह्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व सह दुय्यम निबंधक कार्यालये नियमित कामकाजाच्या दिवसांप्रमाणे सुरू ठेवण्यात येणार आहेत.या निर्णयामुळे शेवटच्या दिवसांतील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुरळीत आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांना वाढीव दर लागू होण्यापूर्वीच व्यवहार पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी उपलब्ध अतिरिक्त दिवसांचा योग्य वापर करावा आणि आवश्यक कागदपत्रांसह वेळेत कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.


