onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक 06-04–2026 एकुण कांदा गोणी -37,866
लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 1000 ते 1300
2 नंबर= 700 ते 1000
3 नंबर= 350 ते 700

4 नंबर= 150 ते 350

केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कुटुंब तीन लिटर केरोसीन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वितरण सुरळीत व्हावे यासाठी किरकोळ विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. कमिशन प्रति लिटर 6 रूपये 75 पैशांवरून वाढवून 13 रुपये 50 पैसे केले आहे. 1 एप्रिल 2026 पासून हा सुधारित दर लागू करण्यात आला आहे.

इराण-इस्त्रायल व अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटले आहेत. एलपीजी सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने शासनाने ग्रामीण व शहरी भागात सिलिंडर बुकिंगवर मर्यादा आणल्या आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी केरोसीनचा पर्याय पुढे करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शासनाने 2 लाख 16 हजार लिटर केरोसीनचे नियतन मंजूर केले आहे. मात्र सुरूवातीला घाऊक व किरकोळ विक्रेत्यांनी वितरण व्यवस्थेतील अडचणी, वाढते खर्च आणि अपुरा नफा यामुळे केरोसीन वितरणास नकार दर्शवला होता. या पार्श्‍वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेत किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन प्रति लिटर 6 रूपये 75 पैशांवरून वाढवून 13 रूपये 50 पैसे केले आहे.

केरोसीन वितरणात होणारे नुकसान लक्षात घेऊन घाऊक परवानाधारकांसाठीही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. तापमानवाढीमुळे होणारी घट व हाताळणीदरम्यान होणारे नुकसान भरून काढण्यासाठी डेपो दराच्या 0.25 टक्के इतका भत्ता मंजूर करण्यात आला आहे. तसेच, डिझेल दरवाढीचा परिणाम लक्षात घेऊन केरोसीन वाहतूक दरात 40 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे वाहतूकदारांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.

दरम्यान, एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके स्थापन केली आहेत. तरीही काही ठिकाणी काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील गरजू कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles