प्राथमिक शिक्षक बँकेला 11 कोटी 78 लाखांचा ढोबळ नफा; ठेवीवरील16 कोटी 50 लाख व्याज सभासदांच्या खात्यावर जमा

शिक्षक बँकेचे कायम ठेवीवरील16 कोटी 50 लाख व्याज सभासदांच्या खात्यावर जमा- गोरक्षनाथ विटनोर
आर्थिक वर्षात बँकेला 11 कोटी 78 लाखांचा बँकेला ढोबळ नफा- ज्ञानेश्वर शिरसाठ
अहिल्यानगर -प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने सन 2025 -26 या आर्थिक वर्षात निवळ 11.78 कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असून 31 मार्चला साडेदहा हजार सभासदांच्या खात्यावर कायम ठेवीवरील व्याज 16 कोटी 50 लाख रुपये खात्यावर जमा केले असल्याची माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन  गोरक्षनाथ विटनोर यांनी दिली.
शिक्षक नेते व गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे मार्गदर्शक बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या संचालक मंडळाने या आर्थिक वर्षात पारदर्शक व काटकसरीचा कारभार करून सभासदांच्या कायम ठेवीवर सर्वाधिक सात टक्के व्याज दिले व ही रक्कम 31 मार्च रोजी सभासदांच्या खात्यावर जमा केली, असे व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी सांगितले.
 या आर्थिक वर्षात शिक्षक बँकेच्या ठेवी 1612 कोटी तर कर्ज वितरण 1150 कोटींच्या वर झालं आहे. मुदत ठेवीवर साडेसात टक्के व्याज असून कर्जावर 8.40% ते 7.50 %असा व्याजदर आहे .ठेवी वरील व कर्जावरील व्याज दराच्या सरासरी 0.80% च्या फरका मध्ये संचालक मंडळांने कारभार करून विक्रमी 7 टक्के कायम ठेवीवर व्याज दिल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
 गुरुमाऊली मंडळ सत्तेवर आल्यापासून गेल्या आठ-नऊ वर्षापासून कायम ठेवीवरील व्याज 31 मार्च रोजीच खात्यावर जमा होते.यापूर्वी सभासदांना एक- दोन-तीन टक्के कायम ठेव व्याज मिळायचे व ते व्याज प्रत्यक्ष हातात पडायला सर्वसाधारण सभेची वाट पाहावी लागायची. मात्र गुरुमाऊलीने सभासदांना कायम ठेवीवर जास्तीत जास्त व्याज देऊन व्याज 31 मार्च रोजीच जमा करण्याची परंपरा जपली आहे.सभासदांना लाभांशही समाधानकारक दिला जाईल,असे माजी चेअरमन बाळासाहेब तापकीर यांनी सांगितले.
 शिक्षक बँकेत ऑनलाईन व्यवहार सुरू असून बँकेच्या ॲपवरून IMPS सुविधा कार्यान्वित झाली आहे.UPI लवकरच सुरू होणार असून पारदर्शक कारभारामुळे सभासद व ठेवीदारांचा विश्वास बँकेवर वाढला आहे.त्यामुळे बँकेकडे ठेवीचा ओघ वाढता आहे.
-डॉ. संदीप मोटे मा.चेअरमन तथा संचालक
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक रामेश्वर चोपडे,अण्णासाहेब आभाळे, कैलास सारोक्ते,सरस्वती घुले,शशिकांत जेजुरकर,माणिक कदम, योगेश वाघमारे,कारभारी बाबर,निर्गुणा बांगर,महेश भनभणे,शिवाजी कराड,कल्याण लवांडे मुख्य कार्यकारी अधिकारी  सूर्यकांत जगताप आदी संचालक उपस्थित होते.
 शिक्षक बँकेसोबतच विकास मंडळाच्या ठेवीवर ७% व्याज दिल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केल्याचे मत अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांनी सांगितले. बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वात विकास मंडळाचा कारभार सभासदाभिमुख असल्याचे सांगितले.यावेळी संतोष आंबेकर(सचिव),दिलीप गंभीरे,(उपाध्यक्ष),सुवर्णा राठोड,(खजिनदार),संतोष मगर,विलास गवळी,चांगदेव काकडे,नवनाथ दिवटे,प्रदीप दळवी,मुकुंदराज सातपुते,दत्तू फुंदे गणेश गायकवाड,राजेंद्र निमसे,संजय शेंडगे,बाळासाहेब गमे,अनिता उगले,मनीषा गाढवे,उर्मिला राऊत, व्यवस्थापक सुरेंद्र आढाव उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles