Thursday, October 30, 2025

महिला गवत आणायला गेली, परतलीच नाही;प्रियकरासोबत पळून गेली नगर जिल्ह्यातील घटना…

शेतात गवत आणण्यासाठी गेलेली महिला अचानक गायब झाली. तिच्या अंगातील साडीचा तुकडा, मोबाईल कव्हर, विळा रक्त लागलेल्या अवस्थेत शेतात सापडल्याने तिला बिबट्याने उचलून नेलं असावं असा अंदाज बांधत ग्रामस्थांमध्ये चर्चा होऊ लागली. या महिलेला बिबट्याने अफवा पसरली नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. घटनास्थळ आणि परिसरात वन विभाग आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी ४८ तासात शोध घेत पहिले नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील संबंधित महिलेला तिच्या लहानपणीच्या मित्रासोबत ताब्यात घेतले. त्यामुळे संबंधित महिलेला बिबट्याने नेलं नसून ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं समोर आलं आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ३७ वर्षीय विवाहित महिला ही राहत्या घरी बारागाव नांदूर येथून २८ मार्चला गवत कापायला जाते असे सांगून त्यांच्या शेतातील उसात गेली होती. महिलेच्या घरी दोन जनावरे असल्यामुळे तिचा पती सकाळ – संध्याकाळ जनावरांसाठी गवत आणायला जात असतो. २८ मार्चला पतीची तब्येत बरी नसल्याने ती सायंकाळच्या सुमारास एकटीच गवत आणायला गेली होती. संध्याकाळी साडेसहा सात वाजूनही ती परत न आल्यामुळे तिचे कुटुंबीयांनी शेतात जाऊन तिचा शोध घेतला असता तिच्या साडीच्या कापडाचा तुकडा, मोबाईलचं कव्हर, तिचं मंगळसूत्र, हातातील फुटलेल्या बांगड्या, मोबाईल बॅटरी, तसेच गवत कापण्यासाठी नेलेला विळा रक्त लागलेल्या स्थितीत दिसले. तसेच, कापून ठेवलेले गवतही अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले, त्यामुळे ती गवत कापत असताना तिला बिबट्याने हल्ला करून नेलं असा समज कुटुंबाचा झाला आणि त्यांनी तात्काळ पोलीस आणि फॉरेस्ट विभागाशी संपर्क साधला.

पोलीस आणि फॉरेस्ट विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी, तसेच गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी सदर महिलेचा आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला. परंतु ती मिळून न आल्याने नातेवाईकांनी ३० मार्चला ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सदर घटना घडल्या ठिकाणाची पोलीस विभागामार्फत फॉरेन्सिक टीम व श्वानपथक यांच्यामार्फत बारकाईने तपासणी करण्यात आली. परंतु सदर ठिकाणी कोठेही बिबट्याचा हल्ला झाला आहे, असा पुरावा मिळाला नाही. त्यावरून महिलेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला अशी खात्री पोलिसांना झाली. परंतु, सदर विवाहित महिला गायब झाल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. महिला शेतात जाण्यास घाबरु लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व अचूक तांत्रिक विश्लेषणातून सदर महिलेचा शोध घेतला असता ती महिला प्रवरा संगम तालुका येथे मिळून आली. तेव्हा ती तिच्या लहानपणीच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं समोर आलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles