अहील्यानगर शहरातील उपनगरातील श्रीमान बीशंबरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयाच्या 2003 सालच्या दहावीला असणार्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच रंगला.
सुरवातीला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व मित्र-मैत्रिणींनी आपली ओळख करूनदेत मनोगते व्यक्त केली. सामाजिक, व्यावसायिक, नोकरी आणि कुटूंब सांभाळतांना शाळेचे संस्कारच कामी आल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले.
गेट टू गेदर आयोजनाकामी प्रदीप काळे व मित्रपरिवार आदींनी पुढाकार घेतला. यावेळी माजी विद्यार्थी यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला
पस्तिशी ओलांडल्यामुळे सर्व मित्रमैत्रिणी काका-काकू झाल्याने अनेकांना शरीरयष्टीपाहून हसूआवरत नसल्याचे चित्र दिसले.शिक्षकांचा मार, बालपणीच्या गमती जमती आणि सध्याची सुख-दुःखे जुन्या मित्र-मैत्रिणींनी एकमेकांशी बोलले. संध्याकाळ झाली तरी जुन्या मित्रांना सोडून परतीच्या प्रवासासाठी पाय माघारी फिरत नव्हते. जातांना एक सुंदर आणि आशयसंपन्न स्नेहमेळावा पार पडल्याचे समाधान सर्वांच्याच चेहर्यावर झळकत होते.
शेवटी वंदे मातरम् घेऊन कार्यक्रम ची सांगता झाली
नगर शहरातील नय्यर माध्यमिक विद्यालयाच्या 2003 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
- Advertisement -


