ठाकरवाडी(आळे)या दुर्गम भागातील शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा

ठाकरवाडी(आळे)या दुर्गम भागातील शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा

अहिल्यानगर : दुर्गम व डोंगराळ माथ्यावर स्थित ठाकरवाडी (आळे), तालुका राहुरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये १ एप्रिल २०२६ रोजी दाखल पात्र मुलांपैकी पहिल्याच दिवशी सुमारे ७०% मुले इयत्ता पहिली मध्ये दाखल झाल्याची माहिती या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निमसे यांनी दिली .

जिल्हा परिषद अहिल्यानगरचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेतून जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचा पट वाढविणेकामी एक एप्रिल रोजी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशोत्सवाचा शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .याच उपक्रमातून दुर्गम व आदिवासी बहुल व मुळा धरण पाणलोट क्षेत्रातील ठाकरवाडी (आळे ) या शाळेमध्ये पहिल्याच दिवशी पंधरापैकी दहा मुले दाखल झाली आहेत.या शाळेमध्ये भौतिक सुविधांबरोबरच अन्य डिजिटल शैक्षणिक सुविधांद्वारे अध्ययन अध्यापनाचे धडे मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया अत्यंत प्रभावी होऊन त्यांना आनंददायी स्वरूपात शिक्षणाचा लाभ मिळत आहे .

या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट व बिस्किटे देऊन या शाळेतील सहशिक्षक शौकत शेख यांनी या सर्व मुलांचे यथोचित स्वागत केले.

चौकट : जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा इयत्ता पहिली मध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच दाखल करण्याच्या स्तुत्य उपक्रमामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील पटसंख्या वाढ होण्यास निश्चितच मदत होणार असून यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये पुरेशा शिक्षक उपलब्धतेमुळे विद्यार्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये निश्चितच वाढ होणार आहे .

— राजेंद्र निमसे,राज्य संयुक्तसचिव ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles