Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर शिवसेनेचे संपर्क प्रमुख सातपुते यांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

अहिल्यानगर-शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांच्या चारचाकी वाहनाचा शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे कार पुलावरून खाली कोसळली. यात कार पलटी झाली असून कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर कारचालक जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

तलाठी महेंद्र मालन काळे (वय 40, रा. भूषणनगर, केडगाव) असे मयताचे नाव आहे. तर चालक भाऊ कांडेकर हे जखमी झाले आहेत. सातपुते व त्यांचे चार सहकारी शनिवारी बीड येथे लग्नासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री बाराच्या सुमारास सारोळा बद्दी येथे त्यांची कार अचानक छोट्या पुलावरून खाली कोसळली. यात कार पलटी झाल्याने कारमधील तलाठी काळे यांचा मृत्यू झाला. तर कांडेकर हे जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आव्हाड करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles