Tuesday, October 28, 2025

गोरक्षकांच्या पाठीशी शहर शिवसेना ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा – शहरप्रमुख किरण काळे

गोरक्षकांच्या पाठीशी शहर शिवसेना ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा – शहरप्रमुख किरण काळे ;

सतनाम गोशाळेत चार वाटप कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी : हिंदू धर्मामध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्व आहे. गोमातेच्या संरक्षणासाठी गोरक्षक जीवावर बेतून काम करत असतात. गोरक्षकांवर हल्ले होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. प्रशासन जाणीवपूर्वक गोरक्षकांना टार्गेट करत आहे. शहर शिवसेना ठाकरे पक्ष हे खपवून घेणार नाही. आम्ही गोरक्षकांच्या पाठीशी ते करत असलेल्या धर्मकार्यासाठी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन शहरप्रमुख किरण काळे यांनी केले आहे.

हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेमध्ये चारा वाटप कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी
प्रा.अंबादास शिंदे, रावजी नांगरे, सुनील त्रिपाठी, किरण बोरुडे, प्रशांत पाटील, ऋतुराज आमले, सुजय लांडे, तुषार लांडे, गिरीधर हांडे, विकेश गुंदेचा, महावीर मुथा, दयाशंकर विश्वकर्मा, दत्तात्रय गराडे, मिलन सिंग, अनिकेत कराळे, केशवराव दरेकर, परमेश्वर बडे, अभय बडे, विठ्ठलराव फुलारी, विलास उबाळे, जयराम आखाडे, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, शंकर आव्हाड, अशोक जावळे, विनोद दिवटे, किशोर कोतकर, रोहित वाघमारे, बाबासाहेब वैरागर, दीपक काकडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळे म्हणाले की, स्व. राठोड यांनी आयुष्यभर हिंदुत्वाचे काम केले. त्यांना जनतेने हिंदू धर्मरक्षक ही पदवी दिली. काही लोक आज राजकीय स्वार्थापोटी स्वतःच्या नावापुढे हिंदू धर्मरक्षक स्वतः लावून घेत स्वतःची पाठ बडवत आहेत. असं केल्याने कोणी हिंदू धर्मरक्षक होत नाही. स्व. राठोड हेच अहिल्यानगर शहरातील खरे हिंदु धर्मरक्षक होते, आहेत आणि राहतील.

सुनील त्रिपाठी म्हणाले, स्व. राठोड जरी आपल्यातून शरीर रूपाने गेले असेल तरीही ते शिवसैनिकांच्या मनामध्ये सदैव आहेत. त्यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या कार्याला तोड नाही. प्रा.अंबादास शिंदे म्हणाले, स्व. राठोड यांनी कायम सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर शिवसैनिक सतत काम करत राहतील. रावजी नांगरे म्हणाले, स्व. राठोड हे कोणत्याही सर्वसामान्य माणसाचा फोन आला की त्याच्या मदतीसाठी क्षणात धावून जायचे. तशाच पद्धतीने शहर शिवसेना नगरकरांच्या मदतीसाठी तत्पर आहे.

प्रशांत पाटील म्हणाले, शिवसेना कात टाकून पुन्हा एकदा कामाला लागली आहे. शहरात शिवसेनेची भरभराट झालेली आगामी काळात पाहायला मिळेल. विकेश गुंदेचा म्हणाले, नागरिकांच्या काही तक्रारी, समस्या असतील तर त्यांनी शिवालयात यावं. शिवसेना स्टाईल त्यांना सगळी मदत केली जाईल. गिरीश हांडे म्हणाले, स्व. राठोड हे गो भक्त होते. त्यांनी गोरक्षणाच काम करणाऱ्या अनेक संस्थांना कायम मदत करण्याच काम केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles