Friday, October 31, 2025

मनपा निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (गवई गट) खलबतं

मनपा निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (गवई गट) खलबतं ;

शासकीय विश्रामगृहावर पार पडली बैठक

प्रतिनिधी : सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर होणार आहे. मागील आठवड्यात मातोश्री येथे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शहर प्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष, शिव – शाहू – फुले आंबेडकर चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी भव्य प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे शिवसेना आणि रिपाई (गवई गट) यांच्यामध्ये आघाडी बाबत खलबतं सुरू झाली आहेत. ठाकरे सेनेचे शहर प्रमुख किरण काळे आणि रिपाई (गवई गट) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली आहे.

यावेळी कामगार सेनेचे विलास उबाळे, केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे, युवा सेनेचे आकाश आल्हाट, सामाजिक न्याय सेनेचे विकास भिंगारदिवे, रिपाई अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गुलामअली शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नईम शेख, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष विल्सन रूकडीकर, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान, भिंगार शहराध्यक्ष स्वप्नील साठे, अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष निजाम शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, शहर सचिव आफताब बागवान, युवक शहर उपाध्यक्ष योहान चाबुकस्वार, युवक शहर सचिव हुसेन चौधरी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महायुती विरुद्ध शहर विकास आघाडीच्या चर्चा सुरू असल्या तरी देखील अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. महाविकास आघाडीचे देखील चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र ठाकरे शिवसेनेने मनपा निवडणुकीसाठी आता कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. स्वबळावर लढायचे की आघाडी करून याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शहर शिवसेनेला दिले होते. त्यानंतर ठाकरे शिवसेना आणि रिपाई गवई गट मनपा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप समोर आलेली नाही. मात्र मातोश्री येथे ठाकरे, शिवसेना नेते तथा राष्ट्रीय प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या समवेत शहर प्रमुख काळे यांनी रिपाईचे शहराध्यक्ष म्हस्के यांची चर्चा घडवून आणली होती. त्या भेटीचे फोटो देखील समाज माध्यमां मधून वायरल झाले होते. माध्यमांमधून तशा बातम्या पुढे येत होत्या. त्यानंतर शहर पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशावरून शहर प्रमुख काळे यांनी शिवसेना बळकट करण्याचे काम जोमाने सुरू केले आहे. आगामी काळात ठाकरे शिवसेना रिपाई (गवई गट) आघाडी झाल्यास मनपा निवडणुकीत रंगत येणार एवढे मात्र नक्की.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles