गळफास घेवून तरुण शेतकर्याची आत्महत्या सोनई जवळील श्रीरामवाडी येथील शेतकरी राहुल जयराम निमसे (वय 38) यांनी रविवार 23 रोजी खेडले परमानंद रस्त्यावरील शेतातील लिंबाच्या झाडाला दोराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीत काही दिवसापासून उत्पन्न कमी होत असल्याने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली.या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेवासा येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर सायंकाळी लांडेवाडी रस्त्यावरील अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
Ahilyanagar Suicide News :गळफास घेवून तरुण शेतकर्याची आत्महत्या
0
39
Related Articles
- Advertisement -


