Thursday, October 30, 2025

आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रशासनाने मनपा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर,प्रभागाची लोकसंख्या सरासरी

अहिल्यानगर: महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा मनपा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. या आराखड्यानुसार प्रत्येकी ४ सदस्यांचे १७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. सदस्य संख्या ६८ असणार आहे. एक प्रभाग सरासरी २० हजार लोकसंख्येचा (कमी-अधिक १० टक्के) असणार आहे.

आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली. प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी उपायुक्त मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. सन २०१२ च्या जनगणनेनुसार कमीत कमी १८ हजार ३०० ते जास्तीत जास्त २२ हजार ४०० या दरम्यान प्रभागांची लोकसंख्या राहील. शहराच्या उत्तर भागापासून म्हणजे वडगाव गुप्ताच्या सीमारेषेपासून प्रभाग १ ची सुरुवात करण्यात आली आहे. झिकझॅक पद्धतीने अंतिम प्रभाग क्रमांक १७ ची सीमारेषा केडगाव उपनगरात दाखवण्यात आली आहे. एका प्रभागातून चार सदस्य असणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या प्रारूपाची छाननी केली जाईल व त्यानंतर आराखडा नगरविकास विभागाकडे सादर केला जाईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे तो सादर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने त्यांचे प्रतिनिधी म्हणून विभागीय आयुक्तांची नियुक्ती केली आहे. ३ पासून सप्टेंबरला प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर दि. ८ सप्टेंबरपर्यंत त्यावर हरकती मागवल्या जातील. ९ ते १८ सप्टेंबर दरम्यान त्यावर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जुलै २०२५ पर्यंतची विधानसभा मतदारसंघ मतदारयादी निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकीसाठी २ लाख ५७ हजार मतदारसंख्या होती. ती आता वाढून ३ लाख ७ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या निवडणुकीसाठी ३३७ मतदान केंद्रे होती. सुधारित निकषानुसार एका मतदार केंद्रात ७०० ते ८०० मतदार असणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत ६० ते ६५ ने वाढ होऊन ती एकूण ४१० होण्याची शक्यता आहे.

प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रभागांचे आरक्षण ठरले जाणार आहे. परंतु एकूण ६८ जागांपैकी ३४ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या आदेशानुसार २७ टक्के ओबीसी आरक्षण असणार आहे. त्यानुसार ६९ पैकी १८ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असतील. अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १ जागा राखीव असणार आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या ३४ जागांपैकी अनुसूचित जातीच्या ५, अनुसूचित जमाती १, नागरिकांचा मागास प्रवर्गच्या ९ अशा १५ जागा विविध प्रवर्गांतील महिलांसाठी आरक्षित असणार आहेत; तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १९ जागा राखीव असतील. एकूण ६८ पैकी २१ जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असतील, असे उपायुक्त मुंडे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles