जि प शाळांमधील विद्यार्थी गुणवता व दर्जा कौतुकास्पद
राळेगणसिद्धी शाळा भेट : शिक्षणाधिकारी भास्कर पाटील
अहिल्यानगर :शाळेच्या पहिल्याच दिवशी अहिल्यानगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी व पानोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली.
राळेगणसिद्धी येथील शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेचा दर्जा, भौतिक सुविधा व बाल वाचनालय पाहून त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मिशन आरंभ परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षिस देऊन अभिनंदन केले. पानोली शाळेतही सर्व वर्गांची तपासणी करून यावर्षी इयत्ता चौथी, पाचवी ,सातवी साठी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी विद्यार्थ्यांचा सराव घेण्याच्या सूचना दिल्या. इयत्ता पाचवीच्या नुकत्याच झालेल्या मिशन आरंभ सराव परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक केले. शालेय गुणवत्ता तपासणी बरोबरच माझी आदर्श शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, विद्यार्थी सुरक्षा, माजी विद्यार्थी संघाची स्थापना व मेळावे ,सरल पोर्टल व यु-डायस पोर्टल वरील कामकाज इत्यादी बाबींचा आढावा घेऊन आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. शाळेतील फ्युचरिस्टीक क्लासरूम, सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, ओपन सायन्स पार्क यांची पाहणी करून नियमित वापर करण्याबाबत सूचना दिल्या. शाळेतील विद्यार्थी वाचनालयातील विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून जतन केलेल्या अभिप्रायाचे कौतुक करून सदर उपक्रम सर्व शाळांनी राबवावा ,असे मत त्यांनी व्यक्त केले .
पदमभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत राबवित असलेल्या मिशन आरंभ व मिशन आपुलकी या उपक्रमांची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली. यावेळी अभ्यास दौऱ्यावर असलेले प्राध्यापक प्रदीप हिंगणे, गटशिक्षणाधिकारी , कांतीलाल ढवळे, मुख्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी पोपट धामणे, शिक्षण विस्तार अधिकारी विनेश लाळगे, केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे, राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी, माजी सरपंच लाभेश औटी, विशेष शिक्षिका लता बोरूडे, दोन्ही मुख्याध्यापक सुनिल दुधाडे व रमजान शेख व सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनेश लाळगे यांनी केले तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले .