कर्जत-येथील आरोग्य सेवक संतोष कांतीलाल भैलुमे (वय 47) हे सोमवारी (दि.12) नगर-सोलापूर महामार्गाने दुचाकीवरून प्रमोशनचे पत्र आणण्यासाठी नगरकडे जात असताना घोगरगाव पुलाजवळ कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष भैलुमे हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून बनपिंपरी प्राथमिक आरोग्य केंत्यांना पदोन्नती मिळाली म्हणून ते जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे पत्र आणण्यासाठी नगर-सोलापूर महामार्गावरून जात असताना घोगरगाव गावाजवळ असणार्या पुलाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. अपघात एवढा गंभीर होता की संतोष भैलुमे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये अतुल कांतिलाल भैलुमे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.द्र या ठिकाणी कार्यरत होते.
- Advertisement -


