Sunday, February 22, 2026

अहिल्यानगर जिल्हा परिषद राबवणार गावागावात प्लास्टिक संकलन व साठवणूक मोहिम

अहिल्यानगर स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत, ग्रामस्तरावरील उघड्यावर दिसणारा प्लास्टिक कचरा संकलन व साठवणूक करण्याची विशेष मोहिम राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली.या मोहिमेत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनासह प्लास्टिक कचरा संकलन, साठवणूक, वाहतूक, व्यवस्थापन आणि रस्ते बांधकाम, सिमेंट कारखाने, पुनर्वापर याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायतींमध्ये उघड्यावर दिसणारा प्लास्टिक कचरा संकलन व साठवणूक करण्याबाबत जिल्ह्यात पुढील 1 महिन्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यात प्लास्टिक संकलन करून योग्य ठिकाणी साठवणूक करणे, साठवणूक केलेल्या प्लास्टिक कचर्याची नोंद ग्रामपंचायत व तालुकास्तरावर ठेवणे, जेणेकरून तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर साठवणूक केलेला प्लास्टिक कचरा प्रक्रिया करण्याकरिता पाठवण्यात येणार आहे.

हे काम विस्तार अधिकारी (पंचायत) यांना तालुकास्तरावर समन्वय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. या अभियानाचा कालावधी 30 जुलै असा राहणार आहे.अभियानात तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर ब्लॅक स्पॉट (कचरा ठिकाणे) शोधून काढणे, ग्रामपंचायतीमधील दर्शनी भागातील प्लास्टिक कचरा संकलन करणे, आणि संकलित झालेला प्लास्टिक कचरा ग्रामपंचायत स्तरावर साठवणुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे याबाबत सहाय्य घेण्यात येणार आहे. शालेय स्तरावरही विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचराबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना गटशिक्षण अधिकार्‍यांनी शाळांना दिल्या आहेत.

ग्रामपंचायत अंतर्गत प्लास्टिक वापराबाबत जनजागृती, दंड आकारणी, आणि प्लास्टिक बंदी ठरावानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त सण उत्सव साजरा करण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या विशेष मोहिमेचा तालुक्यातील सर्व गावांमध्ये यशस्वीपणे कार्यान्वित करण्यासाठी गावातील महिला बचत गट, युवक मंडळ, शाळा, व ग्रामस्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जलजीवनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles