Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर प्रथम महापौर भगवान भगवान फुलसौंदर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार
शहराचे प्रथम माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी सुनिता फुलसौंदर यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, मीना चोपडा आदींनी आपले उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दाखल केले आहे. या प्रभागातून भगवान फुलसौंदर व त्यांच्या पत्नी आतापर्यंत शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. या प्रभागामध्ये गणेश भोसले, सुनिता फुलसौंदर, मीनाताई चोपडा, प्रकाश भागानगरे असे राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी जवळपास २१०० च्या पुढे अर्जांची विक्री झाली होती. ६८ जागांसाठी तेराशेच्यावर उमेदवार इच्छुक आहे. महायुतीतील जागावाटपचा खेळ तेरा दिवसांपासून सुरू होता. अखेर सोमवारी दुपारीनंतर महायुतीत बिघाडी झाल्याचा निर्णय झाला. भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती झाली तर शिवसेना स्वबळावर निवडणूक रिंगणात आहे. त्यातच राजकीय घडामोडींना वेग येऊन पक्षांतर सुरू झाले. युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी महायुती तुटल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ उबाठाच्या पदाधिकार्‍यांनीही प्रवेश केल्याने शिवसेनेला बळ मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती. अर्जात काही त्रुटी राहू नये,याची खबरदारी घेण्यात आली. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात झुंबड उडाली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles