अजिंक्य शेवते यांची एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड
आंतरराष्ट्रीय एशियन चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचे नेतृत्व करणार
नगर – हिंजवडी येथे अलीकडेच पार पडलेल्या इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन आयोजित एशिया चॅम्पियनशिप निवड चाचणीमध्ये अहिल्यानगरचा सुपुत्र अजिंक्य अनिल शेवते याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. अजिंक्यची मेन्स स्पोर्ट फिजिक 180 सेंटीमीटर वरील गटात थेट भारताच्या नेतृत्व करण्यासाठी निवड झाली असून, तो आता थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशियन चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे.
ही स्पर्धा १८ ते २५ ऑगस्ट दरम्यान थायलंडमध्ये पार पडणार असून, विविध आशियाई देशातील नामवंत खेळाडू यात सहभागी होणार आहेत. अजिंक्यने आपल्या कष्ट, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले असून, त्याच्या या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अजिंक्य शेवते याचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत