माजी जिल्हा परिषद सदस्य मुळा सहकारी साखर कारखाना सोनई चे माजी संचालक!आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे ना.अजितदादा पवार यांच्या निवास स्थानी पक्ष प्रवेश केला.
यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री आ.संजय बनसोडे, आ.शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी नगर शहर अध्यक्ष संपत बारस्कर आदी उपस्थित होते.
अशोक गायकवाड यांच्या समवेत प्रा.भीमराव पगारे, सुरेशराव गायकवाड, सुखदेव शिंदे, ल्युथर गायकवाड आदींनी पक्ष प्रवेश करुन ना.अजित दादा पवार यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या व अशोक गायकवाड यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता त्यांच्यावर राज्यपातळीवरील जबाबदारी द्यावी असे आ.जगताप यांनी ना.अजितदादा पवार यांना विनंती केली. यावेळी अशोक गायकवाड म्हणाले की, शहरात व जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय, धोरणाप्रमाणे काम करुन, पक्ष बळकट करण्याचे काम केले जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
अशोक गायकवाड यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र…राष्ट्रवादीत प्रवेश
- Advertisement -


