अहिल्यानगर जिल्ह्यात विमान इंधन चोरीचा पर्दाफाश! 88 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपी जेरबंद

विमान इंधन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, गव्हाणवाडी येथे ATF इंधनाचा काळाबाजार उघड, 03 आरोपीकडुन 88,58,770/-रु कि.चा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शखेकडुन कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 05/04/2026 रोजी पो.नि/श्री. किरणकुमार कबाडी, स्था. गु. शा. अहिल्यानगर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी पोउपनि/ राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, दिपक घाटकर, संतोष खैर, गणेश धोत्रे, चालक उमाकांत गावडे अशांचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहीती काढुन कारवाई करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना पो.नि/श्री. किरणकुमार कबाडी यांना गुप्त माहिती मिळाली की, गव्हाणवाडी येथे हॉटेल महाराजाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये विमान इंधनाचा अवैध साठा करण्यात आला आहे.
त्यानुसार श्री.प्रविण लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांच्या उपस्थितीत पथकाने तात्काळ छापा टाकला असता, सदर ठिकाणी इंडियन ऑइल कंपनीच्या टँकर (एम.एच.04 एल.क्यु. 6865) मधुन 03 इसम ड्रममध्ये ATF इंधन (विमानाचे इंधन) काढतांना आढळुन आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे 1) मुकेश रामअकबाल सिंग, वय-26 वर्षे रा. अहियापुर ता.मछलीशहर, जि.जौहनपुर, राज्य उत्तरप्रेदश, 2) रामभवन रामतिरथ राजपुत वय-32 वर्षे रा. मु.पिप्राइसमाईल, पो.फतेपुर ता.मनकापुर, जि.गौंडा, राज्य उत्तरप्रदेश, 3) चंदु शिवराम जांभळकर वय-41 वर्षे रा. गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर असे असुन त्यांचेकडे तपासात उघड झाले की, टँकरमधील सील तोडुन ATF इंधन (विमानाचे इंधन) चोरी करुन विक्रीसाठी साठवण्यात येत होते. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार हरीष भिमसिंग रा.पिंपरी, पुणे व इतर साथीदार फरार असुन त्यांचा शोध सुरु आहे.
वरील आरोपीचे कब्जातुन 1) 45,91,870/- रु कि.चे 28,000 लिटर ATF इंधन, 2) 40,00,000/-रु.कीचा एक टाटा कंपनीचा टँकर, 3) 1,96,800/-रु .कि.चे 12,000 लिटर ATF इंधन 06 लोखंडी टिपाडे, 4) 15,000/-रु कि.ची इंधन काढण्याचे इंजिन व साहित्य,5) 34,000/-रु .कि.चे 17 लोखंडी टिपाड, 6) 20,000/-रु.कि.चे एकुण 20 प्लॅस्टिक ड्रम, 7) 1100/- रु कि.चे इतर साहित्य असा एकुण 88,58,770/- रुपये किंमतीची मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सदर आरोपी विरुध्द बेलवंडी पो.स्टे. गु.र.नं. 84 /2026 भारतीय न्याय संहिता कलम 287, 288,318(4), 303(2), सह जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चेकलम 3, 7, स्फोटके अधिनियम 1884 चेकलम 9(b) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व मा. श्री प्रविण लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles