राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड दौरा केला. यावेळी, पाहणीदरम्यान शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढते नागरीकरणावर भाष्य करताना त्यांनी पुण्यात आणखी तीन महापालिकांची गरज व्यक्त केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी महापालिकांचाही उल्लेख केला. मात्र, अजित पवारांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुणे दौऱ्यावर होते, त्यांना तीन महापालिकांसंदर्भात प्रश्न विचारला असता, लगेच त्याची निकड नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात पुण्यातील महापालिकांवरुन वेगवेगळं मत असल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यात राज्यातील राष्ट्राच्या प्रोजेक्टच्या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा होत आहे. त्यामध्ये, एक महापालिका सिडको किंवा वेगवेगळी प्राधिकरण असते प्रोजेक्ट करतात त्याची कार्यशाळा आहे. तसेच, वेगवेगळ्या एजन्सी काम करत आहे त्याचे प्रशिक्षण आहे, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी, अजित पवारांनी पुण्यात आणखी तीन महापालिका होण्याची गरज व्यक्त केली, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला . त्यावर, उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी लगेच ती निकड नसल्याचं म्हटलं.
तीन महापालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत, अजून एक असं तीन करा असं अजितदादांचं म्हणणं आहे. अजून तीन नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन मनपा आहेत, अजून एक महापालिका करा अशी चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे. आता तरी PMRD केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण भविष्यात ज्याप्रकारचं शहरीकरण पुण्यात होतंय, भविष्यात कधीतरी आपल्याला हा विचार करावाच लागेल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले.


