28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. यावेळी बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार या विमान अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती सुरूवातीला होती. मात्र, त्यानंतर अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे स्पष्ट झाले. विमान अपघातादरम्यानचे काही व्हिडीओही पुढे आली. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर तीन ते चार मोठे स्फोट झाले. भीषण आग विमानाला लागली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चार दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यादरम्यान शरद पवार यांनी मोठे भाष्य करत म्हटले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. यादरम्यानच आमदार रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मोठे संशय व्यक्त करताना दिसत आहेत.
नुकताच रोहित पवार यांनी म्हटले की, रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्सचा फोटो यायला हवा होता. पण त्यात त्यांनी दिला नाही. अहमदाबादचा स्फोट मोठा होता. त्यातील ब्लॅक बॉक्स सापडला. त्यातून डेटा निघाला. पण डीजीसीएने तो पूर्णपणे दिला नाही. त्यालाही मोठी कंट्रोवर्सी आहे. तो विषय नंतर घेऊ. यूएसमध्ये लेअरजेट पडलं होतं. त्याचा ब्लॅक बॉक्स सापडला. त्यातील सर्व माहिती रिकव्हरी करण्यात आली.“व्हिके सिंगचा फोन आला होता. दीपक बोरकरला आम्ही फोन केला होता. आमच्या माणसाला व्हिके सिंगचा फोन आला. त्यांना वाटलं ते पत्रकार आहेत. एआयबीने मला क्लिअरन्स दिला आहे. अधिकची माहिती तुम्हाला कशाला हवी. खालपासून वरपर्यंत आमची ओळख आहे, असं व्हिके सिंग आमच्या लोकांना सांगत होता. कोणीच आमचं बिघडवू शकत नाही. असं व्हिके सिंग बोरकरला म्हणाले” असा दावा रोहित पवार यांनी केला. “आताही आमचे प्लेन उडत आहेत. सरकारही आमचे प्लेन वापरत आहे तर तुम्हाला अडचण काय? असा सवाल व्हीके सिंगने केला आहे. व्हीके सिंग हा व्हिएसआरचा मालक आहे. व्हॉट्सअप कॉल आला. तुमच्याकडे व्हॉट्सअप हॅकिंगची यंत्रणा असेल तर काढा. सहा महिने तो कुणाशी बोलत होता तेही काढा. महाराष्ट्र सदनमध्ये व्हिके सिंग कुणाला भेटला होता. तेही काढा. एवढा मोठा नेता गेल्यावर एवढी हिंमत येते कुठून?” असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना अनेक मोठे गौप्यस्फोट केले. “आम्ही एफआयआर करा म्हणून सांगतो. पुरावे देऊन एआयबी चांगला तपास करेल वाटलं. पण कोणाची दखल घेत नाही. सुशांत सिंगच्या बाबतीत बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर दोन दिवसात सीबीआयने प्रकरण हाती घेतलं. अजितदादा जाऊन महिना झाला. त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याला १४ दिवस होऊनही चौकशी केली जात नाही. याचा अर्थ काय?” असं रोहित पवार म्हणाले.


