अकोल्यातील अकोट फैल भागात काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवकांमध्ये राडा झालाय. या दरम्यान, दोन्ही पक्षाचे नगरसेवकांचे समर्थक देखील एकमेकांवर भिडले होते. यानंतर झालेल्या राड्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आलाये. तो गंभीर जखमी असून अन्य चार जण यात जखमी झाले. त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे नगरसेवक आणि समर्थक यांच्यातील तणाव सातत्याने वाढतचं आहेये. काल रात्रीही अकोट फैल भागात एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यातील शाब्दिक वादाचे रूपांतर अल्पावधीतच झटापटी, हाणामारी आणि दगडफेकीत झाले. या गोंधळादरम्यान, एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला झालाय. या घटनेत आणखी एकत्रित 5 जणही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
एमआयएमचे नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवक तसेच त्यांचे समर्थकांमध्ये हा संपूर्ण राडा झाला होता. महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून सुरू असलेली अंतर्गत राजकीय धुसफूस हेच या वादाच प्रमुख कारण असल्याचे समजतं आहे. या घटनेनंतर, परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.


