Monday, March 16, 2026

गॅसनं वाढवलं टेन्शन ; युद्धाचा फटका आता दारूलाही बसणार….

गॅस टंचाईमुळे आता तळीरामांचाही घसा कोरडा राहणार आहे… होय तुम्ही बरोबर ऐकताय…. अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या तळीरामांना होणारा मद्य पुरवठा ठप्प होण्याची चिन्ह आहेत… छत्रपती संभाजीनगरमधील मद्यनिर्मिती कंपन्यांकडे कॅन आणि काचेच्या बाटल्याचा साठा फक्त 15 दिवसांपूरता मर्यादित असल्यानं मद्य पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे.

छ.संभाजीनगरमध्ये व्हिस्की उत्पादन करणाऱ्या आणि बीअरच्या ६ अशा १२ कंपन्या आहेत… 2025 अखेर जिल्ह्यात 4832. 83 कोटीचं मद्य उत्पादन होत होत.. यात विदेशी दारूचं 1.26 कोटी लिटर उत्पादन होतं. तर बीअरच्या 1.40 कोटी लिटर उत्पादनाची नोंद झालीय.

मात्र गॅस तुटवड्याचा मद्य उत्पादन कंपन्यांवरही परिणाम होणार आहे.. कारण मद्यनिर्मितीत काचेच्या बाटल्या आणि अॅल्युमिनियम कॅनच्या निर्मितीसाठी औद्योगिक गॅसचा वापर होतो.. संभाजीनगरमध्ये दररोज 4.5 लाख काचेच्या बाटल्या तर 3 लाख कॅनचं उत्पादन घेतलं जातं…

एका सिलेंडरमध्ये 5 हजार बिअर कॅन तयार होतात.. त्यामुळे संभाजीनगरमध्ये एका कंपनीला दिवसाला दीडशे प्रमाणे सहा कंपन्यांना 900 सिलेंडर लागतात… सध्या या कंपन्यांकडे 15 दिवसांचा बाटल्यांचा आणि कॅनचा साठा शिल्लक आहे… त्यामुळे 15 दिवसानंतर दर महिन्याला कंपनींचं 200 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मद्यनिर्मिती उद्योगाचं नुकसान झालं तर त्याचा थेट परिणाम राज्य उत्पादन शुल्कावरही होऊ शकतो, असा अंदाज Excise विभागाच्या अधीक्षकांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे विदेशातली मद्य निर्यातही कंटेनर बंदरातच अडकून पडल्यानं ठप्प झाली आहे… .त्यामुळे आखाती देशांमधील युद्ध थांबले नाही तर फक्त मद्यनिर्मिती कंपन्याचं नुकसान होणार नाही तर राज्य सरकारचा हजारो कोटींचा महसूलही धोक्यात येईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles