उद्या राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर आजच जा. उद्या तुम्हालाही बँकेच्या शाखेत जाऊन काम करता येणार नाहीये. १९ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यातील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बँकांसोबतच शाळादेखील बंद असणार आहेत.महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या १९ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. फक्त बँका नव्हे तर शाळांनादेखील उद्या सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेत काही काम असेल तर उद्या जाऊ नका.बँका बंद असल्या तरीही ऑनलाइन सर्व्हिस सुरु राहणार आहे. ऑनलाइन बँकिंग, नेटबँकिंग, यूपीआय अॅप सुरु राहणार आहे. याचसोबत NEFT आणि RTGS सेवा सुरु राहणार आहे. याचसोबत एटीएम सेवादेखील सुरु राहणार आहे. परंतु तुमचे कॅश डिपॉझिट, चेक क्लिअरन्स अशी कामे असतील तर ती होणार नाहीत. ही कामे तुम्हाला बँकेत जाऊन करायची आहेत.
१९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रात सुट्टी
२० फेब्रुवारी- राज्य स्थापना दिनानिमित्त मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बँका बंद असणार आहे.
२२ फेब्रुवारी- रविवारनिमित्त बँका बंद
२८ फेब्रुवारी- चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.


